पुलाची उंची वाढवण्याची परिसरातील नागरिकांची मागणी...


शालेय विद्यार्थी, गरोदर माता,नागरिक यांना पावसाळ्यात जीव मुठीत ठेवून करावा लागतो प्रवास...

वरोरा... जगदीश पेंदाम

वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम कोकेवाडा धानोली, किनारा, आष्टा या गावातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये फुलाची कमी उंची असल्यामुळे तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी, गरोदर माता शेतकरी, शेतमजूर वृद्ध  नागरिकांना पावसाळ्यात पुलावरून पाणी भरपूर प्रमाणात राहत असून आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे करण्यात येत आहे..
  मार्च  महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नागरिकांना परिपूर्ण सुविधा शासन, लोकप्रतिनिधी कडून पुरविण्यात जात नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात मोठा त्रास होत असतो ग्रामीण भागात पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा त्रास जनतेला होत असते मात्र शासनाने उन्हाळ्यामध्ये  पूलाची कामे केल्यास जनतेचा त्रास होणे दुर्दैवाने बंद होईल पावसामुळे जनजीवन सगळीकडे विस्कळीत  होत असते जवळपास ग्रामीण क्षेत्रातील नदी नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत असल्याने उन्हाळ्यामध्ये कमी उंची असलेल्या फुलाची कामे केल्यास वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, किनारा,आष्टा, धानोली या गावातील शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, वृद्ध नागरिक यांना शिक्षण, दवाखाना, दळणवळणाच्या कामासाठी शेगाव तसेच वरोरा या ठिकाणी जावे लागत असल्याने पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे पाण्यामुळे इरही नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात आपल्या जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत असते त्यामुळे पावसाळ्या अगोदरच फुलाची उंची लोकप्रतिनिधी, शासनाने लक्ष देऊन पुलाची उंची वाढण्याची मागणी  परिसरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!