१०० ब्रास मुरूमाची रॉयल्टी आणि हजारो ब्रास मुरूमाचे उत्खनन
मोटेगाव परिसरात सर्रास सुरु
तहसीलदार झोपेत
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असून देश विदेशातील पर्यटक जंगल सफारी करीता मोठ्या संख्येने येत असतात. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात मरण पावल्याच्या घटना बघायला मिळत आहे. याचे कारण नेमके काय असावे याचा शोध वनविभाग घेत असून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या रेती आणि मुरूम याचे अवैध उत्खनन जंगल भागात ज्याठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्य असते त्याच ठिकाणी मुरूम व रेतीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने वन्य प्राणी त्यामध्ये पडून मृत्युमुखी पडत तर नसेल अशी चर्चा बघावे तिकडे जनतेमध्ये सुरु आहे. अशातच मोटेगाव परिसरात कुठे जंगलाला लागून तर कुणाच्या शेतात तर काही ठिकाणी उमा नदी पात्रात पक्का रस्ता तयार करून रेतीचे भरदिवसा अवैधरित्या उत्खन बघायला मिळत आहे. तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी व पटवारी यांचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत असून महसूल प्रशासनाची माफियासोबत हातमीळवणी तर नाही अशी सुद्धा चर्चा जनतेत सुरु आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन या माफियांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!