चिमूर नगर परिषदेने शहरात सुरु असलेली गुंडागर्दी थांबवावी - सचिन फरकाडे भाजप शहर अध्यक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - मार्च महिना म्हणजे शासकीय कार्यालयाचा वर्षाचा अखेरचा महिना असतो या महिन्यात सर्व कार्यालयीन आर्थिक व्यवहार तपासणी केल्या जात असते याच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर वसुली केल्या जाते. थकित कर वसुली दरम्यान नियमानुसार कर वसुली चे पत्र महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम १५२ नुसार घर मालकास नोटीस दिल्या जाते.परंतु आताच कोरोना या भयंकर महामारीच्या लाटेपासून जनतेला सुटका मिळाली आहे जनतेच्या हाताला कुठलेही काम नसतांना त्यांनी अडीच वर्षे कसेबसे जीवन जगण्याचे काम केले. अनेकांचा या महामाऱी मध्ये जीव गेला. तरी सुद्धा सक्तीची प्रक्रिया म्हणून नगर परिषद चिमूर शहरात बळजबरीने कर वसुली करतांना आज सर्वत्र बघायला मिळत आहे. आणि आज संपूर्ण भरतात हृदय विकाराने बघावे तिकडे मृत्यु झालेली दृश्य दिसून येत आहे. अशातच हा मार्च महिना जणू कोरोना या महामारी पेक्षा भयंकर दिसूलागला असून किमान जनतेला कर भरण्याची सक्ती न बाळगता त्यांना काही अवधी देऊन शांत मार्गाने कर वसुली करण्यात यायला हवी. म्हणूनच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष द्यावे असे चिमूर शहराचे भाजप चे शहर अध्यक्ष सचिन फरकाडे यांनी पब्लिक पंचनामा या वेब पोर्टल च्या माध्यमातून माहिती दिली. व कुणाच्याही दुकानाला व घराला सिल ठोकू नये व याचा त्रास सामान्य जनतेला होऊ नये याबाबत सुद्धा संदेश देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!