व्यवस्थापन परिषद निवडणुकीत डॉ.विवेक गोर्लावार विजयी

व्यवस्थापन परिषद निवडणुकीत डॉ.विवेक गोर्लावार  विजयी



गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची व्यवस्थापन परिषद निवडणूक दिनांक 12 मार्च 2023 ला आयोजित सिमेंट सभेमध्ये घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन व  शिक्षण मंच -अभाविप यांच्यात थेट लढत होती. यात गों.वि. यंग टीचर्स असोसिएशनने शिक्षण मंच - अभाविपचा पराभव करीत व्यवस्थापन परिषद व स्थायी समितीवर सर्वाधिक जागा जिंकून विजयी झाले.
 उच्च शिक्षण क्षेत्रात व्यवस्थापन परिषद हे अत्यंत महत्वपूर्ण व सर्वोच्च प्राधिकरण मानले जात असून  व्यवस्थापन परिषद ही विद्यापीठाची मुख्य कार्यकारी व धोरण आखणारे प्रमुख प्राधिकरण आहे. या परिषदेवर सिनेट सभासदांमधून व्यवस्थापक, अध्यापक व पदवी गटातून दोन दोन प्रतिनिधी निवडून दिले जात असतात. त्यापैकी खुल्या प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेसाठी प्राचार्य, अध्यापक व पदवीधर गटाकरिता थेट लढत होती. या निवडणूकीत महाविद्यालय अध्यापक गटातील खुल्या प्रवर्गातून गों. वि. यंग टीचर्स असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ. विवेक गोर्लावार यांची  थेट लढत गों.वि. शिक्षण मंचाचे महामंत्री डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांच्याशी होती या लढतीत डॉ. विवेक गोर्लावार यांनी डॉ.रुपेंन्दकुमार गौर यांचा 31 विरुद्ध 26 मतांनी पराभव करीत विजय मिळविला.

या व्यवस्थापन परिषद निवडणुकीत मतदार म्हणून सिनेटचे एकूण 76 सदस्या पैकी 61 मतदारांनी आपला मतदाराचा हक्क बजावला यामध्ये विशेषता राज्यपालाद्वारे नामनिर्देशित सिनेट सदस्य असलेले विधानसभा सदस्य मा. आमदार डॉ. देवराव होळी, विधानपरिषद सदस्य मा.आमदार श्री सुभाष धोटे व मा.आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच डॉ. विनोद मोहितकर संचालक, तंत्र शिक्षण विभाग तसेच संचालक, उच्च शिक्षण विभागचे प्रतिनिधी सह संचालक डॉ. प्रशांत ठाकरे साहेब, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन,, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे आणि गोंडवाना विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख व अधिष्ठाता यांनी  मतदान केले. सोबतच सिनेट सदस्य कु. शिवानीताई वडेट्टीवार, सौ. भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर),श्री नितीनजी पुगलिया, डॉ किर्तीवर्धन दिक्षित व अन्य अधिसभा सदस्य मतदानात सहभागी झाले. अधिसभा(सिनेट) निवडणुकीत यंग टीचर्स असोसिएशनचे सर्वाधिक सभासद निवडून आले असले तरीही राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची संख्या अधिक असल्याने शिक्षण मंच व अभाविप चे संख्या बळ अधिक होते. तरीही डॉ. प्रदीपराव घोरपडे यांच्या नेतृत्वात डॉ. विवेक गोर्लावार यांचे योग्य नियोजन  व संघटन कौशल्याने शिक्षण मंच व अभाविप च्या  उमेदवाराचा पराभव करीत विजय संपादन केले.
याआधी सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीमध्ये देखील डॉ. विवेक गोर्लावार यांनी महाविद्यालयीन अध्यापक गटातून विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवितांना तत्कालीन व्यवस्थापन परिषद सदस्य व नुटा संघटनेचे प्रमुख डॉ. योगेश दुधपचारे, शिक्षण मंचाचे डॉ. भुतंमवार, डॉ.आंबेडकर टीचर्स असोसिएशनचे प्रा. विश्वनाथ राठोड  यांचा पराभव करीत विजय संपादन केले होते.
 डॉ. विवेक गोर्लावार यांच्या या विजयामध्ये शिक्षक आमदार श्री सुधाकरजी अडबाले, यंग टीचर्स असोसिएशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, मार्गदर्शक डॉ. प्रदीपराव घोरपडे, डॉ. विवेक शिंदे यांचे कुशल नेतृत्व व मार्गदर्शक लाभले.  त्यासोबतच यंग टीचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ आणि गोंडवाना विद्यापीठाचे सर्व सिनेट सदस्य यांनी त्यांच्या विजयामध्ये मौलिक सहकार्य केले. 
व्यवस्थापन परिषदच्या या निवडणुकीमध्ये गों. वि.यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे ओबीसी प्रवर्गातून अविरोध निवडून आले. तसेच प्राचार्य गटातून डॉ. लेमराज लडके हे विजयी झाले व स्थायी समिती निवडणूकीमध्ये प्राचार्य डॉ. संभाजी वरखड व डॉ. प्रविण जोगी विजयी झाले आहेत. सोबतच चिंतामणी गटाचे श्री स्वप्नीलभाऊ दोनतुलवार व श्री प्रशांत दोनतुलवार हे विजयी झाले आहे. त्यांच्या या विजयाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!