धनश्री तोंडरे शासकीय व आर्किटेक्ट प्रेमचंद पुरस्काराने सन्मानित.



तलोधीं (बा.);      
    भारतातल्या नामवंत आर्ट स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'.ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ऍडमिशन मिळवणं.  इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे.जे.स्कूल ऑफ आर्टनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. 
  कु.धनश्री विष्णुजी तोंडरे रा.पारडगाव येथील विद्यार्थीनी.ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ह्या छोटया गावातून प्राथमिक शिक्षण जि.प. प्राथमिक शाळेतून पूर्ण करून, बेटाळा येथील ज्ञानगंगा विद्यालयातुन माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 12 पर्यंतचे शिक्षण ब्रम्हपुरी येथे पूर्ण करून कलेची आवड असल्याने उच्च शिक्षणासाठी पूर्व परीक्षा देऊन *इंटेरिअर डेकोरेशन* या अभ्यासक्रमासाठी *जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई* येथे प्रवेश मिळविला.कला क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत शासनाचा प्रथमपुरस्कार,आर्किटेक्ट प्रेमचंद पुरस्कार व सुवर्णपदक पटकावले.श्री राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई व श्री विश्वनाथ साबळे अधिष्ठाता, सर जे जे कला महाविद्यालय मुंबई यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
      ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबई येथील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेत उत्कृष्ठ यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!