गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत खासगी प्रवासी ट्रव्हल्स युनियन ने महिलासाठी तिकीट केली ५०%
प्रतिनिधी कुमुदिनी भोयर मूल
महाराष्ट्र सरकारने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पत महिलासाठी ५०% एसटी महामंडळ च्या बसेस च्या तिकीट मध्ये ५०% सूट देण्याची घोषणा केली होती. आणि त्याची अंमलबजावनी पण सुरु झालेली आहे. त्याच घोषनेचा धागा पकडत चंद्रपूर गडचिरीलो ट्रवल्स असोसिएशन ने ट्रवल्स ने प्रवास करणाऱ्या महिलाकरिता तिकिटमध्ये ५०% टक्के विशेष सूट देण्याची घोषणा केली.
चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल असोसिएशन च्या सदस्यांनी तात्काळ मीटिंग घेत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद देत ट्रॅव्हल्स ने रोज हजारोच्या पटीत प्रवास करणाऱ्या महिलासाठी ५०% तिकिटमध्ये सूट देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावनी उद्यापासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त साधत करण्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशन च्या पधादिकाऱ्यांनी जाहीर केले.
त्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!