मौजा बोडधा येथे राजे गृप तर्फे शञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उप संपादक
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - मौजा बोडधा येथे दर वर्षी प्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती राजे गृप तफ्रे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले व नंतर मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.या नंतर राजे गृप तर्फे मसाला भाताचे वाटप करण्यात आले.त्या नंतर गावात मिरवनुक काढण्यात आली,या प्रसंगी राजे गृप व गावातील तरून वर्ग यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर सप्निल मालके माजी उप सभापती पं.स.भावनाताई बावनकर,सदस्य माजी पं.स.राजु कापसे, केवलसिंग जुनी ता.अध्यक्ष म.रा.म.प.संघ तथा शिवसेना उप तालुका प्रमुख, रोशनीताई बारसाकडे सरपंच,सदाशिव घोडमोडे उपसरपंच,प्रभाकर मेश्राम मा.स.ग्रा,प्रमोद सहारे अध्यक्ष त.मु.स , सामुसाकडे आदी.सो ,संभाजी वजभे वनरक्षक,राजे ग्रुप व अन्य मान्यवर उपस्तीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!