जिल्हा परिषद शाळा मालेवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - जिल्हा परिषद शाळा मालेवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच कालिदास भोयर, उद्दघाटक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलाश शेंडे प्रमुख पाहुणे, शिक्षक पंधरे, राऊत , छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी यांनी जीवनावर प्रकाश छत्रपती शिवाजी महाराज 
महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या भारताचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवरायांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. शिवाजीराजे आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांचा संयुक्त नामोल्लेख शिवशंभू असा होतो.शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात ‘शिवजयंती’ राज्यभर एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मेश्राम, यांनी केले तर सुत्रसंचलन निखिल शेंडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!