खेडी येथे शिवजयंती साजरी... अष्ठावधान मंडळाचा पुढाकार...



सावली (प्रतिनिधी) - 
खेडी येथे नवयुवकांची आम्ही अष्ठावधान मंडळाच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा व मिरवणूक काढून शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
  शिवाजी महाराजांनी जातीभेद न करता अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज निर्माण केले. तसेच खेडीतील सर्व जातीचे युवक एकत्र येत आम्ही अष्ठावधान मंडळ निर्माण करून दोन वर्षांपासून शिवजयंती साजरी करीत आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराजांबद्दल चित्रकला घेण्यात आली व गावभोजन करण्यात आले. जयंतीचे दिनी प्रबोधनात्मक कार्यक्रमात  प्रमुख वक्ते माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन काटपल्लीवार होते तर प्रमुख अतिथी माजी सभापती विजय कोरेवार, जिल्हा परीषद शाळेचे मुख्यध्यापक नवनीत कंदालवार, उपसरपंच मुक्ता गरतुलवार, ग्रा सदस्य परशुराम मर्लावार, तंटामुक्ती अध्यक्ष सोमेश्वर कंचावार, शालू अलाम, प्रा देवानंद दुधे, पोलीस पाटील कृपाल दुधे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणातून महाराजांचे जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा या स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्याना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रतीक तुंगीडवार यांनी तर आभार पवन अलाम यांनी मानले. गावातून युवक, युवती, महिलांनी सहभागी होत मिरवणूक काढण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!