पवनीत उभी राहिली शिवसॄष्ठी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - जिजाऊचा आवेश, शिवाजीची ललकारी, मावळ्यांचा डरकाळी प्रत्यक्षात !
शिवजयंतीच्या मुहूर्तावर  गडकिल्ले स्पर्धा, वेशभूषा, निबंध व चरित्र निर्मिती स्पर्धेत  शिवशाही उभी दिसत होती. लक्ष्मीरमा सभागृह पवनी येथे भारतीय जनता पार्टी पवनी तालुका व शहराच्या वतीने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.गडकिल्ले स्पर्धेमध्ये १२२ किल्ले आले सादर करण्यात होते. स्पर्धेत शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वच देखणे किल्ले होते. सामान्य ज्ञान स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. तर वेशभूषा, सादरीकरणात प्रतिज्ञा, शपध, जिजाऊचा करारी बाणा, शिवाजीचा निर्धार, मावळ्यांचा आवेग, अफजलखानाचे कुत्सित हसणे थक्क करणारा सोहळा होता. यामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गडकिल्ले निर्मिती स्पर्धेत प्रथम अभिरा ठोंबरे (पवन विद्यालय),द्वितीय कलेश बावनकर (पवन विद्यालय), तृतीय नैतिक ब्राह्मणकर (मनोसुमन पब्लिक), वेशभूषा नर्सरी ते वर्ग ४ प्रथम प्रियल राऊत, द्वितीय सयाना सय्यद, तृतीय खुशाली दहिवले,वेशभूषा वर्ग ५ ते १० प्रथम स्वरीत जिभकाटे (वैनगंगा विद्यालय), द्वितीय शरयू दलाल (वैनगंगा विद्यालय), तृतीय लावण्या रोहनकर (आनंदम विद्यालय),सामान्य ज्ञान वर्ग ५ ते ७ प्रथम निकुंज मानापुरे (वैनगंगा विद्यालय), द्वितीय युवराज कुंभारगावे (रेनबो), तृतीय आचल भेंडारकर (सरस्वती विद्यानिकेतन आसंगाव), सामान्य ज्ञान वर्ग ८ ते ११ व्यास देशमुख (सेंट पाल नागपूर), देवांशू मुंडले (वैनगंगा विद्यालय),ओम निलेश जमदाडे (जिल्हा परिषद आसंगाव),यांना क्रमशः प्रथम ३१००/-रोख, व्दितीय २१००/- रोख, तृतीय ११००/-रोख सन्मानचिन्ह, सन्मानपत्र खासदार सुनील मेन्ढे, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम  गिरेपुंजे यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल मेंढे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास काटेखाये प्रमुख उपस्थिती अॅड महेंद्र गोसावी, सुरेंन्द्र आयतुलवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन सुरकर, मच्छिंद्र हटवार, अमोल उराडे, प्रकाश कुर्झेकर, राजेंद्र फुलबांधे, हिरालाल वैद्य, दत्तू मुनतिवार, संदीप नंदरधने, सुरेश अवसरे, परशुराम समरीत तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन सुरकर संचलन नीलिमा लेपसे तर आभार प्रदर्शन संदीप नंदरधने यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!