तळोधी बा. येथे नवीन बियर शापी दारू दुकानला गावकरी महिलाचा विरोध




तळोधी बा: येथील ग्रामपंचायत तळोधी बा. च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक मुलीची शाळा येथे विशेष ग्रामसभा आज दिनांक ७फरवरी रोजी आयोजित करण्यात आली होती. यात सभेपुढे एकच विषय बियर शापी मंजुरी देण्याबाबत सरपंच तळोधी यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मात्र तळोधी बा. येथील गावातील महिला व पुरुष यांनी एकत्र येत नवीन बियर शापी ला विरोध करीत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये तसेच गावातील चालू असलेले दारूचे दुकाने गावाबाहेर हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गावातील महिलांनी स्वाक्षरी मोहीम घेऊन बियर शापी ला विरोध केला आहे. तळोधी बा. सरपंच यांनी स्वाक्षरी करून एकीकडे विरोध दर्शविला मात्र दुसरीकडे बियर शापी ला मंजुरी देण्याचा ठराव घेण्यात आला. याला मात्र विशेष ग्रामसभा मध्ये कडाडून विरोध दर्शवून ग्रामपंचायत सरपंच सौ छाया मदनकर यांना नवीन दारू दुकानला परवानगी न देण्याबाबत व गावातील दारू दुकाने गावाबाहेर हटविण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी रुपाली विजय कटारे, पिंकी खेमचंद जुमडे,ज़्योत्सना मदनकर, कल्पना सतीश पाकमोडे, ग्रामपंचायत महिला सदस्य व पुरुष सदस्य यावेळी उपस्थित होते.
कोट
  तळोधी बा. येथील नवीन बियर शापी ला गावकरी वर्गाचा कडाडून विरोध असताना तळोधी बा. येथील सरपंच महोदय यांच्या कडून नवीन बियर शापी ला मंजुरी देण्याचे ठराव घेण्यात आला. तो ठराव रद्द करण्यात यावा अन्यथा महिला च्या वतीने आंदोलन करण्यात येईल. 
रुपाली विजय कटारे
सचिव-अस्मिता महिला ग्राम संघ 
तळोधी बा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!