मूलचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांची बदली
मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश सिंह राजपूत यांची आज प्रशासकीय कारणावरून बदली झाली असून त्यांची बदली चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष चंद्रपूरचे सुनील परतेकी हे आता मूल पोलीस स्टेशनचे नवे ठाणेदार राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज जिल्ह्यातील 34 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढलेत. आज झालेल्या बदली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांचीही बदली झाली असून त्यांची जागेवर पडली येथील ठाणेदार महेश कोंडावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!