रेतीची वाहतूक करणाऱ्या ६ हायवा ट्रक ची चिमूर तहसीलला जप्ती
काही हायवा ट्रक पसार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शंकरपूर मार्गे
अवैध रित्या हायवा ट्रक द्वारे रेतीची चोरी करून नेहमीच मोठया प्रमाणावर वाहतूक व्हायची यावर लोकप्रतिनिधी यांनी पाळत ठेवत महसूल प्रशासनाला १० ट्रकांच्या वर ट्रक पकडून दिले परंतु चिमूर तहसील ला जप्ती करीता ट्रक नेत असतांना काही ट्रक मार्गावरून पसार झाले. तर ६ ट्रक पकडून तहसील कार्यालयात जप्त करण्यास यश मिळाले व पसार झालेल्या ट्रकची कसून चौकशी करून पसार झालेले ट्रक पकडून त्यांच्यावर कारवाई होणार काय? याकडे सुद्धा चिमूर वासीय जनतेचे लक्ष लागले आहे.बघावे तिकडे रेतीची चोरीच - चोरी याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!