समर्पण बहुउद्देशीय संस्थेतर्फे आरोग्य शिबिर संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक 25 फेब्रुवारी 2023 शनिवारला पवनी येथे स्वर्गीय संजय चव्हाण स्मृती प्रित्यर्थ समर्पण बहुउद्देशीय संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिल मेंढे तर प्रमुख अतिथी म्हणून मोहनजी सुरकर,सृष्टी नेत्रालय नागपूरचे संचालक सुनील फडके तथा ब्लड ग्रुप चे संचालक भोयर उपस्थित होते. आरोग्य शिबिरा करीता पवनी परिसरातील शेकडो लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतले, त्याबरोबर परिसरातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थेतर्फे गरजू व्यक्तींना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी आरोग्य तपासणी, औषधी वाटप अशा विविध प्रकारच्या सुविधा संस्थेमार्फत पोचवल्या गेल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता संस्थेचे अध्यक्ष अजय चव्हाण, सचिव शेखर बावनकर, उपाध्यक्ष अतुल मुंडले, महेश कावळे, मुलचंद बावनकर, संदीप नंदरधने, लोकेश दडवे, उल्हास सावरकर, निखिल राऊत, सतीश जांभुळकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संदीप नंदरधने यांनी पार पाडले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!