पोंभूर्णा तालुक्यात अवैध घाटातून अवैधपणे रेतीची तस्करी




  रेती तस्करीचा रात्रीस खेळ चाले

संबंधित जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज.

गावपुढारीच करित आहेत रेती चोरी

पोंभूर्णा प्रतिनिधी:- तालुक्यातील उमा व अंधारी नदी घाट रेती उपसा अवैध रित्या काही दिवसापासून रेती घाटातून मागील दोन महिण्यापासून मोठ्या प्रमाणात रेतीची थेट नदीतून उपसा करून ती रेती रात्रीची संधी बघून बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात पोभूर्णा तालुक्यातील जामखूर्द घाटातुन बिनादिकत पने इतरत्र खेड्यात व शहरात मोठ्या प्रमाणात दररोज शेकडो टँक्टर विकल्या जात आहे . गेल्या दोन महिनाभरापासून सदर प्रकार खुलेआम चालू असून याकडे तालुका प्रशासनाची डोळेझाक असल्याने आर्थिक संशयाची जोरदार चर्चा नागरिकांत सुरू असून जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी सुद्धा नागरिकांत करण्यात येत आहे. 

वैध घाटातून अवैधपणे रेतीची तस्करी तालुक्यात प्रामुख्याने उमा व अंधारी नदी वाहत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी  शासनाकडून रेती घाट लिलाव करण्यात आले नाही. मागील वर्षी तालुक्यातलं महसूल प्रशासन रात्रो दिवसा सर्व कर्मचारी यांना घेऊन गस्ती घालून  अवैध रेती उत्खनन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे रेती तस्कर व  कंत्राटदार यांच्यात मोठी धास्ती निर्माण झाली होती. व बऱ्याच प्रमाणात  अवैध रेती वाहतुकिवर  आळा बसला होता . त्यामुळे पोंभूर्णा तालुक्यात घाटतील  वाळु तस्कर होणार नाही असा मोठा प्रस्न तालुक्यातील अनेक नागरिकांना पडला होता. पण यावर्षी स्थिती उलट झाली असून गावपूढारी जणू लाट्रीच लागलेली असल्याचे  दिसून येत आहे.  दोन महिण्यापासून रेती ठेकेदार घाट लिलाव न होऊन   सुद्धा उमा व अंधारी नदीच्या घाटा मधून बिनदिकत  रात्री मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. 

     सदर रेतीघाटातून संबंधित कंत्राटदाराने रेती काढणे सुरू केले आहे. मात्र, सर्व शासकीय सूचना आणि नियम धाब्यावर बसवत टिप्परने दिवसरात्र नियमबाह्यपणे रेती वाहतूक केली जात असल्याने पर्यावरणाची सुद्धा ऐसीतैसी होत असून मुल व पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामीनांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात ओवर लोड वाहतुकीने रस्त्यांचीही वाट लागली आहे. येथील रेती घाटातून मागील महिना भरापासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे.  यावर जिल्हा प्रशासनाने अंकुश लावणे जरुरीचे असून तालुका प्रशासनावर नागरिकांत संशय निर्माण होत आहे. 

        यावर तात्काळ उपाय न झाल्यास येत्या काही दिवसांत रेती कंत्राट दाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून संघटनांच्या वतीने गाव वाशियाना घेऊन याबाबतीत निवेदन देण्यात येणार आहे.  

       या रेती प्रकरणाची सखोल चौकशी करावी तालुक्यातील इतर गावातून होणारी जड वाहतूक बंद झाली पाहिजे, डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली तर संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई वसूल करावी, व रात्रीला गस्ती घालून अवैध वाळू चोरीवर आळा घालावा  अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

*▪️अधिकाऱ्यांनी घेतले झोपेचे सोंग*
या अगोदर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री व दिवसाढवळ्या ट्रॅक्टरमध्ये रेती चोरी होत आसतांना ट्रॅक्टर जप्त करून कारवाई केल्याचे एकही पूरावा नाही. सोबतच ज्या ठिकाणी रेती टाकली त्या रेतीचा पंचनामा करून कारवाई केल्याचे निदर्शनास आले नाही,  पण वर्षात मात्र पोंभूर्णा तालुक्यातील अनेक गावातील नदी घाटाचे लिलाव झालेले नसताना सुध्दा रेती ठेकेदारावर मात्र कुठलीच कारवाई न करता विशेष मेहरबानी दाखविली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे त्याला पाठबळ तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!