साक्षगंधा पूर्वीच मुलीने केली विष प्राशन करून आत्महत्या.
अर्जुनी येथील घटना
शेगाव.. जगदीश पेंदाम
शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अर्जुनी येथील मृतक अंकिता पतरुजी वाढई वय 24 वर्ष हिचा विवाह चिमूर तालुक्यातील भांसुली पेठ येथील एका युवकासोबत लग्न जुळले होते.आणि 12 फरवरीला सक्षगंधाचा कार्यक्रम ठरला असतांना मृतक मुलीने सांगितले की माझे गावातीलच मुलांसोबत प्रेम असल्यामुळे मी त्याच्यासोबत च लग्न करणार! परंतु कुटुंबाची मान्यता नव्हती आणि तिच्या मनावर परिणाम झाल्यामुळे मृतक ने आत्महत्या केली असावी असे बोलल्या जात आहे.! मृतक मुलीने स्वतःचे घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.सदर घटना 11 फरवरी 2023 ला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडली.
शेगाव पोलिसांना घटनेची माहिती दुपारी 3.30 ला मिळाली.मृतक मुलीला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.परंतु सिरीयस असल्यामुळे चंद्रपूर साठी रेफर केले असता रस्त्यातच मृतकाची प्राणज्योत मालवली.पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!