भटक्या जातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल मंजूर झाले - धनगरांसाठी घरकुल कधी? बल्लारपूर क्षेत्रातील धनगरांचा प्रश्न


मुल (प्रतिनिधी) -
 भटक्या जमातीसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेनंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर क्षेत्रातील भटक्या जमातीतील कुटुंबासाठी घरकुल मंजूर केले. मात्र त्याच क्षेत्रात भरपूर संख्येत असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर जातीसाठी घरकुल मंजूर न झाल्याने धनगरांसाठी घरकुल कधी? असा सवाल धनगर जातीतील लोक करीत आहेत.
     राज्यात भटकी जमात फार मोठ्या प्रमाणात आहे. या जमातीसाठी शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेच्या धर्तीवर भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 24 जानेवारी 2018 च्या शासकीय परिपत्रकानुसार यशवन्तराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही योजना त्यावेळेस राबविण्यात आली नाही. नुकतेच भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन विकास विभागाच्या वतीने 8 फरवरी 2023 शासकीय परिपत्रकानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2803 भटक्या जमातीतील कुटुंबाना घरकुल मंजूर झाले आहे. त्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यात 1904, पोंभुर्णा तालुक्यात 491, बलारपूर तालुक्यात 256 तर चंद्रपूर तालुक्यात 100 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 2 कोटी रुपये निधी समाजकल्याण विभागाला देण्यात आली आहे.
      बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे व समाजाला यशवंतराव घरकुल योजनेत लाभ द्यायला पाहीजे होता पण यादीत धनगरांची नावे नाहीत. धनगर समाजासाठीही निवडणूक काळात फडणवीस सरकारने विशेष घरकुल योजना जाहीर केली होती. विधानसभा निवडणूक काळात धनगर समाजाचा मेंढपाळ मेळावा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता व त्यावेळेसही घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत डावलल्याने धनगर समाजासाठी घरकुल योजना मंजूर करावीकरून  जशी मंजूर केली तशी धनगर समाजासाठी घरकुल योजना मंजूर करावी अशी मागणी बल्लारपूर क्षेत्रातील धनगर समाज करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!