राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा जिल्हा चंद्रपुर च्या वतीने दि.११/२/२०२३ रोज *शनिवारला बाबासाहेब आमटे प्रकल्प सोमनाथ रोड वर असलेल्या मारोडा ,तह.-मूल जिल्हा.- चंद्रपुर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५५ वी पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.
या पुण्यतिथीच्या निमित्याने मारोडा आश्रम गृहामधुन पालखी काढण्यात आली.तसेच चिमुकल्या विद्यार्थ्याची ग्रामगितेच्या एकूण दहा वाक्य वाचन स्पर्धा घेण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. नेफड़ो नागपुर विभगाच्या उपाध्यक्षा सौ.मुस्कावार मॅडम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर तथा पर्यावरणावर मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळाचे अध्यक्ष तसेच नेफड़ो मुल तालुका संघटक मा.कोलप्याकवार यांनी केले.
या कार्यक्रमा मध्ये मा.बतकमवार,सहारे,हजारे,भूपतवार कवाड़कर मॅडम,कवाडकर भाऊ तसेच गावकरी मंडळी पुरुष वर्ग व महिला वर्गाचा समावेश होता.
*या कार्यक्रमसाठी मुस्कावार मॅडम यांनी ५५०/ रूपयाची मद्त सुद्धा केली अशारीतिने हा कार्यक्रम अगदी भजन ,कीर्तनाच्या,चहानाश्ता व महाप्रसादाच्या रुपात अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!