प्रॉमिस डे ला वर्ग मित्र - मैत्रिणीचा तब्बल तीस वर्षानंतर स्नेहमिलन सोहळा
९३ दहावी पास ऑऊट बँच वर्ग मित्र मैत्रिणी, शिक्षकांचा सत्कार व स्नेहमिलन
शेगाव... जगदीश पेदाम
चिमूर तालुक्यातील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रॉमिस डे च्या दिवसाला तब्बल ३० वर्षानंतर ९३ दहावी पास ऑऊट बँच वर्ग मित्र मैत्रिणी स्नेहमिलन सोहळा व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला...
कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास वड्स्कर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त शिक्षक वसंत कडू, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक मधुकर कवासे, भगीरथ कामडी, वसंत अंबादे, पर्यवेक्षक मनोहर मिलमिले, मीनाक्षी गौरकार, शिला पिसे इत्यादी शिक्षक ९३ दहावी पास ऑऊट बँच वर्ग मित्र मैत्रिणीच्या स्नेहमिलन कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी १९९३ ला नेहरू विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी कुणी संसारात तर कुणी आपआपल्या व्यवसायात तर कुणी शासकीय तर खाजगी नोकरी अश्या यांच्यात गुंतले गेले व १९९३ पासून वर्ग मित्र एकमेकापासून दुभंगले गेलेले वर्गमित्र प्रॉमिस डे च्या दिवसाला तब्बल ३० वर्षानंतर नेहरू विद्यालयाच्या सभागृहात एकत्र आले. या भेटीने वर्ग मित्र मोठ्या आनंदित व उत्साहित दिसून आले. व एकमेकांच्या चेहऱ्यावर प्रॉमिस डे च्या दिवसाला स्मितहास्य दिसून आले होते. कार्यक्रमात अनेक सेवानिवृत्त शिक्षकांचा व उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत वड्स्कर यांनी सांगितले की, सर्वात पहिले गुरुजन असतील तर ते आईवडील नंतर शिक्षक, शिक्षक हा विद्यार्थ्याना घडविण्याचे काम करीत असतो. या शाळेतून सुध्दा अनेक विद्यार्थी घड्लेत तसेच या शाळेतून अनेक विद्यार्थी खूप मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तर कोणी विदेशात सुध्दा नोकरीवर आहेत. इतकेच नाही तर या नेहरू शाळेने चिमूर विधानसभा क्षेत्राला दोन आमदार दिलेत. ते म्हणजे एक मितेश भांगडिया व बंटी भांगडिया असे दोन विद्यार्थी या क्षेत्राचे आमदार झाले आहेत. असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमाला ९३ दहावी पास ऑऊट बँच चे तब्बल ३० वर्षानंतर एकत्र आलेले दिनेश कठाणे, स्वप्निल लांडे, पवन तकसांडे, अरविंद लोथे, पितांबर पिसे, कैलास लोणारे, मिलिंद कामडी, साईनाथ बुटके, सचिन लेनगुरे, प्रशांत मारगोनवार, विवेक कहुरके, माधुरी हेमके, नितेश साठोणे, सतीश खोब्रागडे, सतीश लुथडे, प्रिती असावा, चंद्रकांत अरडे, मुक्ता सिरास, उषा हेलवटकर, किरण ठावरी, कुंदा पटेल, उपस्थित होते. यावेळी ९३ दहावी पास ऑऊट बँच शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाचे प्रस्ताविक पवन ताकसांडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन मुक्ता सिरास यांनी केले तर आभार उषा हेलवटकर यांनी केले...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!