वाढदिवसाचे औचित्य साधून बालक, महिला मेळावा आणि वृक्षारोपण
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर तालुका मूल
दि.१२/२/२०२३
मुल तालुका संघटिका नेफडो तसेच मुल येथील जेष्ठ कवियित्री सौ.शशिकला गावतुरे यांचे ७७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे स्वगृही छोटेखानी महिला आणि बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.प्रथम क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन आणि मालार्पण घेण्यात आले.कार्यक्रमाचीसुरवात बालकांच्या गीत गायन आणि नाटिका सादरीकरणाने झाली.एका चिमुकलीने गुरुदेव प्रार्थनेचे महत्व तिच्या बोबड्या शब्दातुन व्यक्त केले.
वयाच्या ७७ व्या वर्षीही उत्साहाने प्रत्येक कार्यात सहभागी होणारे सभासद म्हणून मुल तालुक्याच्या वतीने शाल, श्रीफळ,पिंपळ आणि पेरूचे रोप देऊन शशिकला गावतुरे यांचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे मॅडम यांनी उपस्थित महिलांना संस्थेविषयी सविस्तर माहिती देऊन संस्थेला जुळण्याचे आवाहन केले.शशिकला गावतुरे यांनी उपस्थित नेफडो सभासदांना भेटवस्तू देऊन सभासदांचा सन्मान केला. तसेच गावतुरे काकुंच्या वाढदिवसानिमित्त निकुरे नवदांपत्याच्या हस्ते निकुरे यांचे आवारात शेवग्याच्या रोपांचे रोपण करण्यात आले. अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, कविता मोहुर्ले नागपूर विभाग सचिव,मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा, शशिकला गावतुरे तालुका संघटिका,नंदा शेंडे तालुका संघटिका,सिमा लोनबले सामाजिक कार्यकर्त्या,शालु गुरनुले योगशिक्षीका,किरण चौधरी मॅडम,ढवस मॅडम,चुधरी मॅडम, रणदिवे मॅडम, दांडेकर मॅडम,गभणे मॅडम,निकुरे मॅडम,लोनबले मॅडम लेनगुरे मॅडम,चटारे मॅडम,
बुक्कावार मॅडम योगशिक्षीका, अनेक पर्यावरण प्रेमी महिला आणि बालगोपाल उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!