कोणत्याही सरकारी कार्यालयात जायला तरुणांनी घाबरू नये-.. उपसरपंच वैभव ठाकरे



शेगाव.. जगदीश पेंदाम
 राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "चला जानुया उमा नदीला"हा 7 दिवसीय कॅम्प चिमुर तालुक्यातील उसेगाव येथे आयोजित करण्यात आला होता.या सातही दिवस गावात विविध कार्यक्रम,उपक्रम साजरे करण्यात आले होते..
 या समारोपिय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आंबोली गावचे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना राजकारण, समाजकारण,स्पर्धा परीक्षा व आदर्श नागरिक या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना भारतात लोकशाही व्यवस्था असून कोणत्याही कामासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जायला घाबरू नका असा संदेश दिला.यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ.बन्सोड सर,सरपंच प्रियंका पाटील,उपसरपंच निखिलेश चाफले,कार्यक्रम अधिकारी प्रा.राजूरवाडे सर,प्रा.कंत्रोजवार सर,प्रा.वाघमारे सर आदी उपस्थित होते......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!