सावली तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठाचे विजेचे कनेक्शन कापले - हर घर नल अभियानाचा विपरीत परीणाम जलजीवन मिशनचा फज्जा - नळ लागले पण पाणी पोहचेना
एकीकडे सर्व घरी नळाद्वारे पाणी देण्याचा केंद्र सरकारचा अभियान सुरु आहे मात्र दुसरीकडे सावली तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची महावितरणने वीजकपात केल्यामुळे 25 गावे तहानलेली राहणार आहेत.
सर्वांना पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत मोफत घरोघरी नळ जोळणी केली परंतु गावापर्यंत पाणी पोहचेल याची सुविधा प्रथम निर्माण न केल्याने नवीन व जुन्या नळ धारकांना पाणीच पोहचत नसल्याने मिशनचा फज्जा उडालेला आहे.
केंद्र शासनाने 'हर घर नल से जल' या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने अभियानाला गाजावाजा करीत सुरवात करण्यात आली आहे. पूर्वी प्रत्येकाला किमान ४० लिटर पाणी या उद्देशाने योजना बनविण्यात आले होते. परंतु ४० लिटरही पाणी मोजके नळ धारकांना मिळत नव्हते त्यात ५५ लिटर व प्रत्येक घरी शासन निधीतून मोफत नळ जोडणी करून दिले. नळाचे लाभधारक वाढले मात्र पाणी साठवणुकीच्या टाकी, जुने पाईपलाईन दुरुस्ती ही कामे सुरवातीला करण्यात आल्या नाहीत. त्याचा परीणाम असा झाला की ज्यांनी पूर्वीपासून नळ जोडणी करून नियमित पाणी कर भरत होते त्यांनाही पाणीपुरवठा नियमित होत नाही व ज्यांनी अभियानांतर्गत मोफत नळ जोडणी केली त्यांनाही पाणी मिळत नाही. त्यामुळे जल जीवन मिशनचा फज्जा उडालेला आहे. पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांनी कर (टॅक्स) भरणे बंद केले आहे. याचा परीणाम असा झाला की ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभागाकडे देखभाल दुरुस्ती व वीजबिल भरण्याइतपत पैसे नाही. महावितरणने वीजबिल थकीत असल्याने कनेक्शन कापले व 25 गावाचा उन्हाळ्याचा काळात पाणीपुरवठा बंद आहे.
💧हर घर जल, हर घर नल उपराटे धोरण💧
सर्वाना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने सुरु केलेल्या अभियानात सुरुवातीला जुने पाईपलान बदलणे, नवीन पाणी टाकी बांधणे अशा भौतिक सुविधा निर्माण करून घरोघरी नळ जोडणी करायला पाहीजे. पण उलट काम सुरु असल्याने कोणालाही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!