कोळशाच्या खाणीतून हिरे जन्मास येतील - ठाणेदार बोरकर @ खेडी जिल्हा परीषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न
सावली - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेडी येथे बाल आनंद मेळावा हा कार्यक्रम सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनात पार पडला. विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थाचे स्टाल लावून विक्री केली, यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून पैलू समजून घेत बाल आनंद मेळावा साजरा केला.
जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा खेडीचे वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहीद झालेल्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सावलीचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी पोक्सो कायद्याचे अधिकाराबाबत मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच ची सविस्तर माहिती दिली. मुलींच्या लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत बाबींवर प्रकाश टाकला. ही केवळ जिल्हा परिषद शाळा नसून एक कोळशाची खान आहे जिथून मेघासारखे हिरे जन्माला येतील असे त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेघा गडगेलवार वर्ग सहावीच्या विद्यार्थिनीने आशिष बोरकर यांची थेट मुलाखत घेतली हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले . विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थ स्वतः तयार करून बाल आनंद मेळाव्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचिन काटपल्लीवार सरपंच खेडी तसेच प्रमुख अतिथी म्हणून अनिल माचेवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, तसेच संध्या कोणपत्तीवार शिक्षण विस्तार अधिकारी, मुक्ताताई गरतुलवार उपसरपंच ग्रामपंचायत खेडी, कृपाल दुधे पोलीस पाटील खेडी , रूपाली कटकमवार उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, भीमराव भडके, संगीता राऊत आरोग्य समन्वयक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे सदस्य प्रमुख पाहुणे उपस्थित होते. गावातील नागरिकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनीत कंदालवार मुख्याध्यापक तसेच सूत्रसंचालन वैष्णवी अण्णावार हिने केले तर आभार प्रदर्शन सुमित देवगडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित्रा कुंमरे शिक्षिका , राजेंद्र ऊराडे शिक्षक, माधुरी निंबाळकर शिक्षिका तसेच प्रतीक तुंगीडवार शिक्षण प्रेमी आणि संपूर्ण शालेय मंत्रिमंडळ यांनी मेहनत घेतली




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!