शिवशाही मित्र परिवार तर्फे शिवजयंती निमित्य भव्य शोभा यात्रेचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन




मुल :- (प्रतिनिधी)
येथील शिवशाही मित्र परिवाराकडून सन 2015 पासून शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे.    कोविड काळात  सामाजिक भान ठेऊन शिवशाही मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाला कोविड ची परिस्थिती हाताळायला  तत्परता दाखवली.
त्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजन करणे, बाहेरील राज्यातील येणाऱ्या लोकाची कोरोना चाचणी करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, कोरोना ग्रस्त व्यक्तीस दवाखण्यात दाखल करणे तसेच प्रशासकीय अधिकारी तसेच ठाणेदार साहेब यांच्या विनंतीला मान देऊन कामात मदत करणे
दरवर्षी  शिवशाही मित्र परिवार तर्फे शिवजयंती च्या कार्यक्रमाची  सुरुवात दहा दिवस आधीच करून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन यात, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, सोमनाथ येथे अन्नदान , शहर स्वच्छता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आणी तसेच शिवजयंती ला शोभा - दिव्य शोभा यात्राचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये शहरातील सर्व नागरिक सहभागी होतात. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन नागरिकाच्या लोकसहभागातून होत असून यात कोणत्याही राजकीय पक्षच सहभाग नसतो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवजयंतीला भव्य शोभायात्रेचे  आयोजन शिवशाही मित्र परिवाराकडून करण्यात आले व शोभयात्रेची सुरुवात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान. ठाणेदार सुमित परतेकी साहेब यांच्या हस्ते पूजन करून ढोल ताश्यांच्या गजरात करण्यात आली. शोभयात्रेत महाराजांचे विविध देखावे व बग्गी उभारले होते. मूल येथील थोरांपासून ते बालकापर्यत  चा सहभाग दर्शनीय होता.
ही शोभयात्रा च्या यशस्वितेसाठी स्थानिक मूल येथील सर्व शासकीय प्रशासन व पोलीस दल यांनी सहकार्य केले व शिवशाही मित्र परिवार यांचे सुंदर नियोजनाने कार्यक्रम यशस्वी पार पडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!