प्रा.महेश पानसे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ - मुंबई पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ - मुंबई शाखा चिमूर तर्फे प्रा.महेश पानसे पूर्व विदर्भ विभागीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने दि.०३ फेब्रुवारी २०२३ ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे डॉ. बेंडले यांच्या उपस्थितीत उप जिल्हा रुग्णालय चिमुर येथे आंतर रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले.यावेळी केवलसिंग जुनी तालुका अध्यक्ष , प्रमोद राऊत उपाध्यक्ष , विलास मोहिणकर तालुका संघटक , आनंद भीमटे सह संघटक , कृष्णकुमार टोंगे सचिव , उपक्षम रामटेके उपाध्यक्ष ,सुनील हिंगणकर सदस्य , योगेश अगडे सदस्य व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!