हिना हिरेण शहा यांचे निधन
मुल शहरातील प्रतिष्ठित व्यापारी हिरेन गोगरी यांची पत्नी हीना गोगरी यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली, त्यांनी नागपूर येथील किंगस रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला, मागील वर्षी १४ आगस्ट ला त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे दवाखान्यात भरती करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर आणि नंतर एअर ॲम्बुलन्सने हैदराबाद येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे तब्बल पाच महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, पाच दिवसांपूर्वीच नागपूर येथील किंग्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेे. हिरेंन गोगरी यांनी शक्य ते संपूर्ण प्रयत्न केले, शेवटपर्यंत त्यांनी आपल्या जीवनसांगिनी साठी संपूर्ण शर्थीचे प्रयत्न केले, पण आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ ला ३.१५ ला त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या मागे सासूबाई, पती हिरेन गोगरी, मुले योग व निर आणि प्रचंड मोठा आप्त परिवार आहे, हीना गोगरी यांच्या निधनाने एक हसमुख, मनमिळाऊ व्यक्तिमत्व नेहमीसाठी लोप पावले असून शहरात शोककळा पसरली आहे.
हिना हिरेन गोगरी हिचे पार्थिक देहावर अंतिम संस्कार मूल येथील उमा नदीचे तीरावार शनिवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येत आहे
साप्ताहिक पब्लिक पंचनामा कडून भावपूर्ण श्रद्धांजली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!