जवराबोडीच्या सरपंच वरील अविश्वास प्रस्ताव बारगडला..
शेगाव... जगदीश पेंदाम
चिमुर तालुक्यात येत असलेल्या
जवराबोडी ग्रामपंचायत मधील पाच सदस्यांनी सरपंच वैशाली नरेश ठाकरे व उपसरपंच अमोल कवडू सावसाकडे यांचे वर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यावर मतदान होऊन सरपंच व उपसरपंच यांच्या बाजूने दोन तर विरोधात पाच मते पडली त्यामुळे हा प्रस्ताव बारगडला असून सरपंच व उपसरपंच आपल्या पदावर कायम आहेत
शासकीय निधीची अफरातफर करणे दिवाळीमध्ये गावात लाईट न लावणे ग्रामपंचायत कडे असलेले ट्रॅक्टर चा विल्हेवाटी संदर्भात हिशोब न देणे इत्यादी तथ्यहीन मुद्दे घेऊन विरोधी सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांचे वर अविश्वास प्रस्ताव मांडला त्यावर दिनांक 23 फरवरी 2023 ला दुपारी दोन वाजता तहसीलदार चिमूर प्राजक्ता बुरांडे यांचे उपस्थितीत मतदान घेण्यात आले असता सरपंच व उपसरपंच यांनी दोन मतांनी विश्वास प्रस्ताव जिंकून आपली पदी कायम ठेवली शासनाच्या नवीन नियमानुसार सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये अविश्वास पारित होण्यासाठी सहा सदस्यांची आवश्यकता असल्याने हा अविश्वास प्रस्ताव बारगडला
या प्रस्तावाच्या बाजूने सुवर्णा महादेव गजघाटे सौरभ चुडामन भशारकर सविता मोहन मिरे रीना उद्धव खाडे वसंता सर्जेराव महाले यांनी मतदान केले तर विरोधात सरपंच वैशाली नरेंद्र ठाकरे व उपसरपंच अमोल कवडू सावसाकडे यांनी मतदान केले..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!