मनरेगा कर्मचार्यांचा काम बंद आंदोलन
मूल (प्रतिनिधी)
महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत कर्मचार्यांनी आपल्या मागण्याकरीता बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.
महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक, क्लर्क कम डाटा एन्ट्री आॅपरेटर यांनी आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
मागील 10 ते 12 वर्षापासून हे कामगार कंत्राटी पध्दतीने कार्यरत आहेत. कोरोणा काळातही मजूरांना रोजगार मिळवून देण्यासाठी या कर्मचार्यांनी काम केले आहे. मात्र शासन या कर्मचार्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या कर्मचार्यांचा आहे.
मनरेगा कर्मचार्यांची स्वतंत्र यंत्रणा तयार करून, आकृतीबंधामध्ये समाविष्ठ करून कायम करावे, पश्चिम बंगाच्या धर्तीवर मानधन द्यावे, वयाचे 62 वर्षपर्यंत नौकरीची हमी द्यावी यासह अनेक मागण्यांकरीता कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!