महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे योग भवन, मूल येथे कपडे वाटप उपक्रम संपन्न.
मूल (प्रतिनिधी)
समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे बुधवार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी योग भवन, मूल येथे कपडे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने *सौ. भारती कोंतमवार, सौ . माधवी येलंकीवार आणि सौ .गिता कोंतमवार* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी *सौ. रत्नमाला भोयर आणि सौ . रेखा पोकळे* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
*या उपक्रमाचा लाभ एकूण १७ गरजू महिलांनी घेतला* .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!