राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यस्मरण स्मृती सोहळा चांदापूर येथे संपन्न





अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ चांदापुर च्या वतीने झेंडा चौक चांदापुर च्या पटांगणावर तीन दिवसीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यस्मरण महोत्सव व सर्व संत स्मुर्ती सोहळा २०,२१ आणि २२ जानेवारी रोजी घेण्यात आला. तीनही दिवशी ग्रामसफाई व सामुदायिक ध्यान करण्यात आले या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजता पासून ते ११ वाजेपर्यंत ग्रमसफाई , घटस्थापना , दीपप्रज्वलन करण्यात आले त्या नंतर विविध भजन मंडळाचे भजन झाले भाजनातून सर्वांचे मन प्रसन्न झाले.तसेच रजुभाऊ घुमणार सर यांचे मार्गदर्शन तसेच क्रांती ताई काळे यांचं कीर्तन झाले.


दुसऱ्या दिवशी सकाळ पासून गितगायन , वक्तृत्व स्पर्धा , महिलांचा भजन , हळदी कुंकू कार्यक्रम , अशे विविध उपक्रम राबविले तसेच रात्रौ ८वाजता श्री.ह.भ. प. रवींद्र ढवळे महाराज यांचा कीर्तन व रात्रौ 9 वाजता चेतन ठाकरे यांचा धमाल विनोदी भारुड चा कार्यक्रम पार पडला .
तिसऱ्या दिवशी ग्राम सफाई करून ठीक 8 वाजता राष्ट्रसंताची रामधून व पालखी सर्व चांदापुर गावातून काढण्यात आली यावेळी चांदापुर वासिय महिला, पुरुष, तरुण, तरुणी , लहान बालके तसेच बाहेर गावावरून आलेले पाहुणे यांनी वेगवेगळे वेशभूषा साकारून रामधून मध्ये सहभागी झाले या वेळी भजन गात , ताल मृदुंग वाजवत खूप आनंद घेतला तसेच या मध्ये भय्याजी मिरगे महाराज यांनी वैराग्य मूर्ती गाडगेबाबा यांचं वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .नंतर कार्यक्रम स्थळी पालखी पोहोचल्यावर उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन झाले व गरजूंना वस्त्रदान, झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले .लगेच गोपाळकाला करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी मुकुंदाजी गरमाळे महाराज यांनी गोपाळकाल्यावर कीर्तन सांगितले .व नंतर संपूर्ण चांदापुर वासियांना लोकवर्गणीतून भोजनदान करण्यात आले अशाप्रकारे तीन दिवस विविध कार्यक्रम राबवून पुण्यतिथी महोत्सव पार पडला यावेळी विविध कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत चांदापुर कमिटी , जगदगुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान चांदापुर, शिवगर्जना क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळ चांदापुर, गुरुदेव सेवा मंडळ भवराळा, कवठी, रुद्रापुर, उसे गाव,सावली, खेडी, चीमढा, हिरापुर, वधोली, केशरवाही, चकपीरंजी , जूनगाव, फुटाणा, बेंबाळ, आदर्श ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था चांदापुर , संपूर्ण महिला पुरुष बचत गट, शाळा व्यवस्थापन कमिटी चांदापुर, जिल्हा परिषद शाळा चांदापुर व चांदापुर हेटी तसेच समस्त चांदापुर व चांदापुर हेटी वसिय जनता आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!