नकली दारू कारखाण्याने निर्माण केले तीन प्रश्न
एक्साईजच्या धाडीने निर्माण केले तीन प्रश्न
मूल तालुक्यातील चितेगांव येथे मूल—नागपूर राष्ट्रिय महामार्गावरील नकली दारू कारखाण्यावर चंद्रपूरचे उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून, तब्बल साडेसोळा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जागेचे मालक आणि या अवैद्य व्यवसायात सहभागी असल्यांची खात्रीशीर चर्चा असलेली अरूणा मरस्कोल्हे, पवन वर्मा उर्फ गोलू, शाम मडावी यांचेसह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहे. आजच्या धाड सत्रात सिलींग मशीन, ग्रेडींग मशीन, 14 बॅरल स्पिरीट, 500 लिटर तयार दारू, दिड लाख लेबल, 50 हजार कॅपसह नकली दारू पॅकींग करीता लागणारे अत्यावश्यक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
उत्पादन शुल्क विभागानी केलेली कार्यवाही अभिनंदनीय असली तरी, या कारवाईतून तीन प्रश्न उपस्थित झाले आहे.
प्रश्न क्रमांक 1
डॉक्टरांना त्यांचे वैद्यकीय उपचाराकरीता, इंजेक्शन देण्याकरीता आवश्यक असलेले स्पिरीट अत्यल्प प्रमाणात मिळतो. मेडिकल किंवा स्पिरीट पुरवठा करणार्यांना त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. शाळेतील प्रयोग शाळेतही स्पिरीट करीता परवाना घेणे बंधनकारक असतांना, या नकली दारू कारखाण्यासाठी तब्बल 14 बॅरल स्पिरीट आणले कुठून? कुणाच्या परवाण्यावर? ज्यांचेवर गुन्हे दाखल झाले, त्यापैकी एकही बडा आसामी नाही, सामान्य नावे आहेत मग, ऐवढ्या मोठ्या प्रमाणात स्पिरीटचा साठा आरोपींना कसा मिळाला? कुण्या बड्या राजकीय व्यक्तीचा सहभाग तर नाही ना?
प्रश्न क्रमांक 2
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी पूर्वीही आणि दारूबंदी असतांनाही, दारूबंदी झाली तर, मोठ्या प्रमाणावर नकली दारू तयार केली जाईल व ते सेवन करून, हजारो लोक मरतील असा युक्तीवाद केला जायचा. दारू समर्थक, काही पत्रकारही हा युक्तीवाद पुढे करून, नकली दारूचे कारखाने तयार होतील असे सांगीतले. चंद्रपूर जिल्हा लिकर लॉबीचे नेते दिपक जैस्वाल यांनीही पत्रकार परिषदेत ही बाब ठळकपणे सांगीतली. मात्र दारूबंदीच्या काळात एकही नकली दारूचा कारखाना सापडला नाही. मात्र मागील दोन वर्षापासून, तत्कालीन पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे पुढाकारातून पुन्हा सरकारी दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर, नकली दारूचा मोठा कारखाना कसा सापडला?
प्रश्न क्रमांक 3
मूल पासून हाकेच्या अंतरावर, थेट राष्ट्रिय महामार्गावरील एवढा मोठा नकली दारूचा कारखाना सर्रास सुरू असतांना, चंद्रपूर येथील उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळते, ते धाड टाकून कारखाना ताब्यात घेतात.. चंद्रपूरच्या अधिकार्यांना जे गुन्हे माहीत होतात ती माहिती मूल पोलिसांना कशी मिळाली नाही? मूल वरून अवैद्य होणारी गोतस्करी सावलीचे पोलिस पकडतात, अवैद्य कोंबडा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचेकडून कारवाई होते. जुगारांवर धाडही घालण्यांचे श्रेय चंद्रपूरचे एलसीबीना जाते. मूलच्या बड्या व्यापार्यांचे 19 लाख रूपये लुटणार्या लुटारूना अटक करण्यासाठीही स्थानिक गुन्हे शाखेला तपास वर्ग करावा लागतो. मूल पोलिसांवर स्थानिक माहिती देणार्यांचा विश्वास नाही कि, मूल पोलिसांवर भरोसा नाही?



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!