जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरगाव च्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरगाव च्या वतीने विवीध कार्यक्रमाचे आयोजन
वार्ता - मंगल राजे मशाखेत्री
74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज शाळेच्या पटांगणात महिला पुरुषांचे कब्बडी, क्रिकेट अंडर अर्म, चमचा गोळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गावातील महिला व पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होत गावातीलच महिला पुरुषांचे संघ तयार करून मोठ्या जोमाने सामने खेळले व जिंकले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित राहून सामन्यांचे भरपुर आनंद घेत स्पर्धकांमध्ये उस्ताह निर्माण करण्याचे काम करत कार्यक्रमाचे आनंद घेतला. या कार्यक्रमाल मुख्याध्यापक मान श्री. नंदीग्रामवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकवृंद चे
मोलाचे सहकार्य लाभले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!