प्रहार जनशक्ती पक्षाचा गांधी गिरी पध्दतीने उजाला करो आंदोलन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पवनी शहरातील वैनगंगा नदी पुलावर आगळा - वेगळा पद्धतीचा आंदोलन ७४ व्या गणतंत्र दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारी ला रात्री काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाने गांधी गिरी पद्धतीने हा उजाला करो आंदोलन दिनांक.२५ जानेवारी रात्री ०७:०० ते १२:०० वाजेपर्यंत करण्याचे नियोजन केले. आणि तयारी सुरू झाली गाड्यांवर मोठे - मोठे बासडे बांधून त्यावर मोठे - मोठे लाईट्स लावण्यात आले आणि संपूर्ण पुल रोषणाईने भरून उठला जरी हा आंदोलन होता तरी अतिशय शिस्तीत व शांततेने या आंदोलनाला पार पाडण्यात आले.यावेळी कुठलीही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण न होऊ देता सर्वसामान्यांची समस्या प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून डोळे उघडण्याचा प्रयत्न पवनी येथे वैनगंगा नदी पुलियावर प्रहार जनशक्ती पक्षा कडून करण्यात आला.कित्येक दशक पूर्ण होऊन सुद्धा पथदिव्यांची सोय या पुलियावर संबंधित विभागाकडून अजून पर्यंत करण्यात आलेली नाही.याठिकाणी अनेक अपघात तसेच आत्महत्या यासारखे विविध प्रकार नेहमी बघायला मिळत असतात यामुळे पवनी तथा शिंदपुरी येथील नागरिकांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण बघायला मिळते.या अगोदर या समस्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षा कडून निवेदन देण्यात आलेले होते. परंतु यावर कुठलीही अमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. म्हणून प्रहार कडून हा आगळा - वेगळा आंदोलन २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासनाचे डोळे उघडावे याकरिता उजाला करो आंदोलन घेण्यात आले या आंदोलनानंतर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रकाश जर संबंधित अधिकाऱ्यांना पडत नसल्यास यासमोर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि सुरू झाली गणतंत्र दिवस उत्साहाची तयारी मग काय कार्यकर्ते पदाधिकारी व तिथे उपस्थित जनता सर्वच आनंदी झाली नंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पुलाला लाईट्स आणि फुग्यांनी फार सुंदर सजविण्यात कसलीही कसर सोडली नाही आणि तो पुल रात्री रोषणाई नी शोभून दिसत होता.
या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी, उपजिल्हा प्रमुख दुधराम बावनकर,पवनी तालुका प्रमुख अक्षय तलमले,जिल्हा महासचिव सोनू दंडारे,रूपेश जुमळे,हेमंत भाऊ,धनराज सेलोकर,रोहित नागपुरे,सोहेल शेख,अमोल बानाईत, नीरज मेंदूलकर,अरुण देशमुख,शुभम धुर्वे,युगल हटवार,चेतन सुरकर,अमोल तेलमासरे,उमेश शेंडे,विशाल बोरुले,अमित थेरे,अमित तलमले,सुहास थेरे, सुदर्शन धुर्वे, व त्रस्त माहिला वर्ग व आदी नागरिक उपस्थित होते.
तसेच पवनी शहर अध्यक्ष हर्षल वाघमारे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!