शंकरपूर येथे तिरंगा थाळी सकस आहार स्पर्धा व आरोग्य विषयक मार्गदर्शन



शेगाव (जगदीश पेंदाम) 
चिमुर तालुक्यातील शंकरपुर येथे सोमवार ला दुपारी एक वाजता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास उद्यम प्रकल्प अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित मैत्री लोकसंचालित साधन केंद्र भीसी तर्फे तिरंगा थाळी स्पर्धा व सकस आहार आणि आरोग्य या संबंधी मार्गदर्शन व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन किल्ला मंदिर सभागृह शंकरपूर येथे करण्यात आला. या कार्यक्रमात शंकरपूर येथील 30 महिला बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिव सदस्य यांनी सहभाग घेतला...

या कार्यक्रमात भावनताई बावनकर माजी पंचायत समिती सदस्य यांनी शिक्षण, राजकारणात महिलांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक विनोद जांभळे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले आणि कृषी सहायक नवले यांनी परसबाग , सकस आहार आणि जैविक शेती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक अनमोल धनविजय, सूत्रसंचालन सहयोगिनी ज्योत्स्ना खोब्रागडे, आभार प्रदर्शन  सहयोगिनी सुचिता मुनघाटे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लेखापाल आणि प्रेरक यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी भाऊराव बावनकर अध्यक्ष सहकारी सोसायटी शंकरपूर, ग्रामपंचायत सदस्य सपनाताई घडसे, रंजनाताई उईके, cmrc उपाध्यक्ष जास्वंदा गाडगे, rgb उषाताई श्रीरामे, ज्योतिताई घोडमारे उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!