नवेगाव पांडव येथे ग्रामगीता प्रणित ग्राम निर्माण महायज्ञ संपन्न
तळोधी बा.;
नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथे दि.१९,२०,२१,२२,२३, जानेवारी पाच दिवसीय ग्रामगीता प्रणित ग्राम निर्माण महायज्ञ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे गावात सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना,अड्याळ टेकडी येथील गुरूकुलातील विद्यार्थ्यांचे भाषण, प्रबोधन, किर्तन अनेक विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन, सामुहिक श्रमदान ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. रामधुण काढुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी
नवेगाव पांडव येथे पार पडली.
दि,२३ जानेवारी ला सकाळी सामुदायिक ध्यान ध्यानावर मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर मुळे गुरुजी यांनी केले, व ७ वा,रामधुण काढण्यात आली रामधुनवर मार्गदर्शन भु वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी येथील मार्गदर्शक व संचालक श्री सुबोध दादा यांनी केले. सकाळी १० वाजता राष्ट्रिय प्रबोधनकार केसाळे महाराज यवतमाळ यांनी 'गाव हा विश्वाचा नकाशा गावावरूनी देशाची परीक्षा गावची भंगता अवदशा येईल देशा' या विषयावर यांनी प्रबोधन केले.
दुपारी १२ वाजता आदर्श ग्राम पाटोदा येथील *भास्कर पेरे पाटिल* यांचे फुलांच्या वर्षावाने व शाल श्रीफळ ग्रामगीता पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. व अधिष्ठानाचे पुजन करन्यात आले.
त्याच प्रमाणे आदरणीय श्री सुबोध दादा यांचे स्वागत शाल श्रीफळ, ग्रामगीता, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, आदर्श ग्राम पाटोदा येथील भास्कर पेरे पाटिल यांनी आदर्श निर्माण या विषयावर*
*लोकांना सरपंचांना गावाला कसे घडवावे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले,*
नंतर ४:५८ मीनीटांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ गोकुल नगर गडचिरोलीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत गुरूमाऊली यांचे भजण सुमधुर वाणीने गाऊन श्रद्धांजली घेण्यात आली, नंतर सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना करन्यात आली सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर आदरणीय श्री सुबोध दादा यांनी केले, व श्री, संतोषजी रडके साहेब यांनी आभार प्रदर्शन करून व राष्टवंदना घेऊन कार्यक्रम पार पडला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!