तेली समाजाचे युवा कार्यशील नेतृत्व गोंडवाना विद्यापीठ सिनेट चे सदस्य प्रा.निलेश बेलखेडे तेली समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

तेली युवक मंडळ ,चंद्रपुर आयोजित मेळाव्यात सत्कार समारंभ संपन्न

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूर तर्फे आयोजित भव्य व़धु वर मेळावा २०२३ रोजी सत्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी व सिनेट सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा.निलेश बेलखेडे यांचा समाजभूषण पुरस्काराने माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,चंद्रपुर विधानसभा आमदार किशोरभाऊ जोरगेवार, माजी आमदार भांडेकर , तेली युवक मंडळाचे अध्यक्ष खनके, तेली समाजाचे जेष्ठ नेते  बबनरान फंड , धनराज मुंगले, बावणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी या यशस्वी कार्यक्रमाबद्दल चे अभिनंदन व आयोजकांचे आभार मानतांना प्रा.निलेश र बेलखेडे यांनी समस्त तेली बांधवाचा ऋणी राहिल व हा सन्मान सदैव समाजकार्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही असच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत समाज बांधवांची, युवा विद्यार्थी वर्गाना सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोच्या वर तेली बांधव-भगिनींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!