बेलदार समाज सेवा समिति बल्लारशाह तर्फे कन्नमवार जयंती साजरी



बल्लारपूर प्रतिनिधी :-(धनंजय पांढरे )
सामन्यातून असामान्यापर्यत ज्याच्या आयुष्याचा प्रवास झाला असे थोर स्वातंत्र्य सेनानी बेलदार समाजाचे प्रेरणास्थान,व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय माननीय मा.सा.कन्नमवार यान्ची 123 वी जयंती बेलदार समाज सेवा कल्याण समिति बल्लारशाह तर्फे श्रीनिवास बुग्गावार यान्चा आरामशीनच्या परिसरात साजरी करण्यात आली !
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समीतिचे अध्यक्ष श्री श्रीनिवास बुग्गावार व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक नायडु यानी आपले स्थान ग्रहन केले मंचावर इतर सदस्याची पण उपस्थिती होती सचिव- सुनील बोपनवार, सहसचिव-वीलास बेझलवार, कोषाध्यक्ष -भास्करभाऊ तेल्लावार 
मंचावर उपस्थिती मान्यवरांकडून  माननीय मा.सा.कन्नमवारजीच्या प्रतिमेस पुष्पमालार्पन व दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली !
जयंती निमित्त प्रास्तविकेत श्री ईश्र्वर नेरडवार यानी स्वर्गीय मा.सा.कन्नमवार यान्चा जीवनचरीत्रबाबत आपले मनोगत व्यक्त केले ! श्री सुनिल बोपनवार  यानी समाजाची दशा व भविष्यातील दीशा यावर मार्गदर्शन केले ! श्री विलास बेझलवार  यानी समाजाची एकजुटता  यावर उपस्थितीताना मार्गदर्शन केले !
कार्यक्रमाला निम्नलीखीत सदस्याची उपस्थिती बघायला मिळाली  सुनिल कुल्दीवार  परेश कुल्दीवार  सुरेश नायडु अजय दिकोडंवार उमेश कोलावार  नागेश नायडु  सदानंद बुध्दारथी राजेश मारशेट्टीवार प्रतिक बेझलवार  पवन बोपनवार 
निम्नलीखीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सौ.मीनाताई कुल्दीवार  सौ.रेखा बेझलवार  श्रीमती छबुताई बेझलवार  सौ.सुवर्णा नायडु सौ.भारती मारशेट्टीवार सौ.सुनिता नायडु सौ.सविता बोपनवार  सौ.शील्पा नायडु  सौ.अश्विनी बुग्गावार  सौ.प्रगती बेझलवार  सौ.रेणुका ताई कुल्दीवार  सौ.प्रचेता बोपनवार  व बल्लारशाह येथील असंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती  
कार्यक्रमाचे संचालन  श्री ईश्र्वर नेरडवार  यानी केले आणी आभार प्रदर्शन          
श्री विलास दिकोडंवार  यानी केले 
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व भोजन व्यवस्था  समाजाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास बुग्गावार परिवाराकडुन करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!