महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे मूल येथे बाल संस्कार शिबिर संपन्न

     
              


      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शुक्रवार दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी स्व . चंद्रचुड येनुरकर माध्यमिक शाळा, चिखली त .मूल येथे बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
    
       या बालवयामध्ये योग्य संस्कार झाल्यास युवा पिढी चांगली घडून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी साहाय्य होऊ शकते या व्यापक उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  *सौ. दिपाली सिंगाभट्टी, सौ . प्रिती लिमजे आणि सौ .गिता कोंतमवार* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका *सौ. अर्चना येनुरकर आणि शिक्षक वृंद* यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
    *या उपक्रमाचा लाभ एकूण ९० विद्यार्थ्यांनी घेतला* .
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!