कृउबास संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराची सोशल मीडियावर चर्चा



कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदभरती पदोन्नतीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यावर अन्याय करीत आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब सोशल मीडियातून उघडकीस आली.
मागील अनेक वर्षापासून कार्यरत येथील कर्मचाऱ्यांनीच, संचालकाकडून केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणल्याने, मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला जातो यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची आर्थिक लुटमार चालवली असल्याची बाबही या निमित्ताने उघड झाली असून, श्रीकृष्ण ग्रुप वरील बाजार समितीच्या दोन कर्मचाऱ्यांचे व्हाट्सअप चॅट चा विचार केल्यास बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हराम चा पैसा जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यास एवढा त्रास दिला की हे कर्मचारी आता या पदाधिकाऱ्यांनी साले हा शब्दप्रयोग करून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजार समितीच्या निवडणुका कशा घेणार? असा प्रश्न करणारी एक बातमी वायरल करीत  बाजार समितीत प्रशासकच हवे. अशी प्रवीण चेपुरवार यांनी मागणी करीत असल्याचे त्यांनीच पोस्ट केली. संचालक मंडळ आले तर पद्दोनत्ती/प्रभार देण्यासाठी करीता रक्कमेची मागणी करतात, त्याचे पेक्षा प्रशासक राज एक दम छान.👍माझ्या बाबतीत घडल आहे.
या पोस्टला टॅग करत बाजार समितीचे दुसरे कर्मचारी सुनील मंगर यांनीही प्रवीण चेपुरवार यांच्या मागणीला दुजोरा देत,
प्रवीणभाऊ तुम्हची गोस्ट 100/, खरी आहे मी सहमत आहो माझ्याही बाबतीत तेच घडलं आहे, नेकी कर जुते खा, वफादारी दाखहून काहीच फायदा नाही, लोकल badi पेक्षा प्रकाशक बरा हे मान्य आहे, जे कोणी आपले नाही त्यांचे काम होतात , प्रमोशन होतात आपल्या लोकांचे होत नाही, जे त्यानां पाहिजे ते देहून सुद्धा
अशी अपबिती सांगत आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.
रिटायर्ड झाल्यानंतर या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची वाट लावण्याचा इशाराही या चर्चेतून दिला.
बाजार समितीच्या सत्तेत असलेल्या या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीला लुटून कसे भ्रष्टाचार केले हे सांगताना, या कर्मचाऱ्यांनी, आपल्या मनातील भावना पुढे शब्दात व्यक्त केली.
प्रवीणभाऊ मी प्रमाणिक पणे सांगतो आपल्यामागे ते फिरणार नाही, कारण की त्यांच्या जवळ खूप हरामाचा पैसा जमा आहे, पण आपण त्यांचे मनापासून काम केलो आहे साले पाप भोगतील, पैसा राहीन पण ते राहणार नाही हा माझा श्राफ आहे, व माझे स्वामी तसे त्यांचा करणातच हे लिहून ठेव, जय स्वामी समर्थ
या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला असला तरी, मुल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे चर्चा सर्वत्र केली जाते. कर्मचाऱ्याकडून वेतन आयोग लावण्याचे नावाखाली, पगार वाढ करण्याचे नावाखाली, मोठी रक्कम घेऊन, खोटी आकडेवारी शासनाकडे पाठवून शासनाची ही फसवणूक या संचालक मंडळांनी केल्याची चर्चाही गाजली होती.
बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारकीर्दीची प्रामाणिक चौकशी झाल्यास अनेक संचालक गजाआड होतील असे मतही काही कर्मचारी आता उघड व्यक्त करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!