बल्लारपूर ठाणेदार मा.उमेश पाटील व पोलीसांचा सन्मान





    बल्लारपूर शहरातील  शांतता व सुरक्षितता संदर्भात नागरिकांचे विविध सन/त्यौहार साजरे करण्यासाठी शांतता व सुरक्षिततेची गरज आहे. त्यातुनच नागरिक आनंद लुटु शकतात.त्या अनुषंगाने बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार *मा.उमेश पाटील* यांच्या मार्गदर्शनात त्यांचे सर्वच पोलीस व कर्मचारी यांनी  सन/त्यौहारां मध्ये नागरिकांशी सलोख्याची वागणुक देऊन शहरात वेळोवेळी कठीण स्थितीत देखिल शांतता व सुरक्षितता बिघडु दिली नाही.
   हे त्यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन *मूलनिवासी संघाचे* वतीने *मा.उमेश पाटील ठाणेदार बल
बल्लारपूर* व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी *मा.जि.के.उपरे,* माजी मानद सचिव चं.जि. म.सह.बॅंक, चंद्रपूर,*मा.एम.टी.साव* सर मूलनिवासी संघ, *मा.वसंत मून*, पत्रकार, आदींनी सत्कार केला.या प्रसंगी *सन्मान चिन्ह आणि भारतीय संविधान पुस्तिका व संविधान सभेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथम व अंतीम भाषणाची पुस्तीका* भेट देण्यात आली.भविष्यात देखिल पोलीस खात्या कडुन अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली. धन्यवाद!!! साव सर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!