उश्राळ मेंन्ढा येथे ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न



तळोधी बा.;
नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंढा येथे   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा  गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित् गावात सकाळी सामुदायिक ग्रामफाई, ध्यान, प्रार्थना, भजन, किर्तन, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले,या कार्यक्रमाला मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय लोक नियुक्त सरपंच श्री.हेमतजी लांजेवार, उपसरपंच जयेश लोंन्ढे, जि.प.शाळेतील मुख्याध्यापक शिवनकर सर, ठाकरे सर, श्री देवानंदजी डोर्लीकर, श्री, धनपाजी बोरकर, पोलीस पाटील विनोद सयाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदासजी तोडासे,श्रीधरजी नैताम, दुधारामजी लांजेवार, गुरुदेव सेवा मंडळाचे  पितांबरजी लोंन्ढे, शामरावजी टिकले , शारदाताई बोरकर, इंदु डोर्लीकर, प्रतिभा बोरकर, मंदा डहारे, इत्यादी उपस्थित होते,
    हसर्व प्रथम पाहुण्यांचे स्वागत 'सेवा मंडल के तत्वग्यान का कंकन जिसने बांधा, वह तुकारामजी दादा' या स्वागत गीताणे स्वागत करण्यात आले, काही मान्यवराना शाल ल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,
अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातुन गावहिताच्या विषयांवर मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे लोक नियुक्त सरपंच साहेब हेमंतजी लांजेवार यांनी आपल्या भाषणातुन 
"नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंन्ढा हे गाव स्वच्छ ग्राम, निर्मल ग्राम ते सातत्यपूर्ण सर्व विकासकार्यामुळे ठरले. गावातील जनतेनी तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गावात श्रमदान, ग्रामस्वच्छता अभियान , रामधुण , रांगोळ्या टाकुन सुशोभित केले असेच जर रोज ग्रामवासीयांनी हा गाव माझा समजुन जर गावाची सेवा केली तर आपला गाव वैकुंठ  वायला वेळ लागणार नाही, गुरुदेव सेवा मंडळाचे मोठे योगदान आहे." असे अनेक विषयांवर आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात माजी पोस्टमन सोमदेवजी डोर्लीकर यांनी व्यंकटेश मंडळाला श्री साईबाबांची फोटो भेट दिली, आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाला वं.तुकडोजी महाजांची फोटो भेट दिली या कार्यक्रमात भास्कर दुधपचारे यांनी दारूमुक्त जीवन जगेण असा संकल्प ३ वर्षा अगोदर केला, त्या निमीत्ताने कार्यक्रमाच सार्थक म्हणून त्यांचा आणि ईतर मंडळींचा ग्रामगीता, दिनदर्शिका,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला,सुरज बोरकर दर गुरुवारी ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होतात त्यांचाही सत्कार करण्यात आला, काजळसर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे महिलांनी. व गावागावातील कार्यकर्त्यांनी यांनी रामधुण मध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक मधुकर टिकले यांनी केले आणि ४:५८ मी.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजांना श्रद्धांजली वाहण्यात आली, नंतर सामुदायिक प्रार्थना करन्यात आली, कार्यकमाची सांगता धनपालजी बोरकर सर यांनी कार्यक्रम आभार प्रदर्शनाने पार पडला,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!