मोटारसायकल चोरून नेऊन जाळणारे आरोपी अखेर अटकेत




शेगाव.(जगदीश पेंदाम) 

येथून जवळच येत असलेल्या बोरगाव धांडे येथे नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याच्या मध्ये रात्री नीलकंठ महाकुलकर यांच्या अंगणातून दुचाकी होंडा कंपनीची ड्रीम युगा mh 34BL 1419 या क्रमांकाची मोटार सायकल आरोपी ने चोरी करून तिला गाव शेजारील नाल्यामध्ये जाळण्याचा प्रकार उघडकीस आला होता...  

  याची माहिती पीडित महाकूलकर यांनी स्थानिक संबंधित शेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार केली तेव्हा या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष देऊन पोलिस अधीक्षक परदेसी  यांचे मार्गदर्शना मध्ये  शेगाव पो.चे ठाणेदार मेश्राम यांनी अधिक तपास करत काही दिवसातच आरोपीला अटक करण्यात यश प्राप्त केले.. 
पोलीस स्टेशन शेगाव बू अप. क्र. 10/23 कलम 379,435 भा. द. वी. मधील आरोपी 1) संदीप रामभाऊ लेडंगे वय 35 वर्ष रा.पाचगाव ,2) निकेश दुर्योधन ढोक वय 23 वर्ष रा. चंदनखेडा येथील दोघांना दिनांक 21 जानेवारीला सायंकाळी अटक करून ताब्यात घेतले असता घडलेला सर्व प्रकरणाची आरोपींनी कबुली केली. या तपासामुळे शेगाव पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून अनेकांच्या मते ही कारवाई कौतुकास्पद असल्याचे परीसरात बोलले जात आहे…..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!