प्रजासत्ताक दिनी कर्तुत्ववान महिलांचा सत्कार - आयशा फातिमा संस्थेचा उपक्रम





मुल प्रतिनिधी 
आयशा फातिमा बहुद्देशीय संस्था मूलच्या वतीने अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविल्या जातात. प्रजासत्ताक दिनी संस्थेच्या कार्यालयात ममता रावत यांचे हस्ते ध्वज फडकविण्यात आला. या निमित्त सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्माण करणार्या महिलांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिना कन्नमवार, तसेच संस्थेच्या अध्यक्षा फरजाना शेख शबनम शेख, वहिदा पठाण, तनविर सय्यद, शकिला शेख आदी उपस्थित होते, कार्यक्रमांचे संचालन उषा दुर्गे केले तर मंगला बोरकुटे पाहूण्याचे आभार मानले कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!