प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकमान्य प्राथमिक शाळेच्या नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला.




शेगाव (जगदीश पेंदाम)
  वरोरा तालुक्यात 74 व्या गणतंत्र दिवसाच्या औचित्याने लोकमान्य प्राथमिक विद्यालय, वरोरा येथील विद्यार्थीनीं पोलीस ग्राऊंडवर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राज आलं राज आलं' या गीतावर नृत्य सादर करण्यात आले होते.. या नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे या नृत्यामध्ये एकूण 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सरोज कथडे आणि जेष्ठ शिक्षिका सौ.उरकांदे मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे नृत्य बसविण्यासाठी शाळेतील शिक्षिका कु. रजनी गोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!