प्रजासत्ताक दिनानिमित्त जि.प.शाळा सावरी (बिड) येथे विविध कार्यक्रम

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा सावरी (बिड) येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्दघाटक गट ग्राम पंचायत सावरी सरपंच लोकेश रामटेके ,प्रमुख अतिथी म्हणून उपसपंच निखिल डोईजड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप निखाडे, उपाध्यक्ष प्रदीप वाकडे जि.प.शाळा उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास हिंवज, चौधरी .प्रमूख पाहुणे म्हणून ग्रा.प. सदस्य दिलिप मोटघरे, रामदास खामनकर,आषिश घानोडे, ग्राम पंचायत सदस्य सौ.नलूताई शेबळे,सौ.भारतीताई सातपैसे,माजी सरपंच सौ. शांताताई वाकडे,माजी  उपसरपंच शेषराव ढेपाले,माजी सदस्य रविभाऊ शेन्डे आदी सदस्यगण व पदाधिकारी उपस्थित होते. जि.प.शाळा सावरी येथिल विद्यार्थी यांनी सांकृतिक नृत्य, संमोह नृत्य कला, सादर करण्यात आले. व सांस्कृतिक नृत्य, संमोह नृत्य कला पाहण्यासाठी सावरी माकोना गावकरी यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन सावसाकडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!