कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत - शासनाकडून निधीच येईना

सावली (विजय कोरेवार) - गरीब कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला आधार म्हणून कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत मिळणारे अनुदान मागील एप्रिल महिन्यापासून मिळत  नसल्याने शेकडो निराधार लाभापासून वंचित आहेत. 
         सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना राबविण्यात येतात. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ६० वयातील कमावत्या प्रमुख महिला- पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आधार म्हणून एकरकमी २० हजार देण्याची योजना आहे. सावली तालुक्यात जवळपास ९० निराधार व्यक्तींचे कुटुंबानी अर्थसाहाय्य योजनेसाठी अर्ज दाखल आहेत मात्र एप्रिल २०२२ पासून शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने निराधार कुटुंब या योजनेपासून वंचित आहेत. 
   इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे केंद्राकडून मिळणारे २०० रुपयेसुद्धा एप्रिलपासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही ८०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. शासनाने अनुदान देऊन निराधारांना आधार द्यावा अशी मागणी होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!