त्या मार्गाचे भोग कधी संपणार ? वरोरा तालुक्यातील बारा घरी असणारे गाव... स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष
शेगाव.(जगदीश पेंदाम)
शासन आणि प्रशासन एकीकडे ग्रामीण भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करत असतो परंतु आजही स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात सोयी सुविधेचा अभाव जानवतांना दिसत आहे, वरोरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागांमध्ये जनतेला अद्यापही पायाभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असुन, वरोरा तालुक्यातील तुकून या छोट्याशा 12 घरे असणाऱ्या गावात त्या मार्गाचे भोक कधी संपणार असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे...
परिसरातील क्षेत्रामध्ये अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा लगत असलेल्या गावांमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधांना तोंड द्यावे लागत आहे....
वरोरा तालुक्यातील शेगाव ही मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेला 70 ते 80 खेडी जोडलेले आहे शेगाव या ठिकाणी हजारो नागरिक, शेतकरी,मजूर,महिला,वृद्ध नागरिक,विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कामासाठी रोज येत असतात मात्र येथे जाण्यासाठी मुख्य रस्तेच बरोबर नसल्याने जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे...
गाव तिथे रस्ता हा शासनाचा नारा असला तरी यापासून अर्जुनी तुकुम, दादापूर,धानोली, कोकेवाडा तू, वायगाव भोयर, या रस्त्याची अत्यंत दुर्दशा अवस्था झाली असून जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले,तर फक्त बारा घरे असणाऱ्या तुकम या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना,शेतमजूर शेती हंगाम मध्ये शेतीकामाला लागणारे साहित्य, बी-बियाणे, अवजारे, कीटकनाशके इतर वस्तू घेण्यासाठी शेगाव याच ठिकाणी जावे लागते, तसेच ,बाजार, दवाखाना म्हणून याच ठिकाणी जावे लागत असल्याने तुकुम या गावातील नागरिकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे...
आजही शेती व पशुपालन उदरनिर्वाह म्हणून गावकरी पशुपालन व दुग्ध व्यवसाय करत असुन यावर गावकऱ्यांच्या उदरनिर्वाह चालत असतो शासनाने व लोक प्रतिनिधींनी यांनी तुकुम या गावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे गाव विकासापासून कोस दूर वंचित राहिले आहे....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!