कोलाम विकास फाउंडेशन चे अध्यक्ष पत्रकार विकास कुंभारे यांचे अपघाती निधन
कोलाम विकास फाउंडेशन चे अध्यक्ष पत्रकार विकास कुंभारे यांचे अपघाती निधन
राजुरा... कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे कोलाम विकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार विकास कुंभारे हे एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते, त्यांना डाॅॅ मानवटकर. चंद्रपुर येथे भर्ती करण्यात आले, परंतू उपचाराला प््ररतिसाद देत नसल्याने अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला, ते कोलाम बांधवांचे काम आटोपून गडचांदूर वरून राजुरा परत असतांना चांदनवही जवळ अपघात घडला. यात त्यांचे डोक्याला गंभीर मार लागला होता, चंद्रपूरला उपचारार्थ नेले होते.
विकास कुंभारे हे वेकोलीच्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत फोरमन पदावर कार्यरत आहे. ते काही काळ सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणूनही काम पहात होते अल्पावधित पत्रकारिता क्षेत्रात नाव लौकीक मिळविला होता, त्यांना राजुराच्या ग्रामीण रुग्णालयात आणले तिथून त्वरित चंद्रपूरला मानवटकर कडे रेफर केले होते, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांचेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते, डाॅक्टरानी शर्तीचे प्रयत्न केले परंतु अखेर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!