पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत जुन्याच जागेवर बांधा--- नागरीकांची मागणी केली
पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत जुन्याच जागेवर बांधा--- नागरीकांची मागणी
तळोधी बा(यश कायरकर)
अप्पर तहसील कार्यालय तळोधी बा. अंतर्गत असलेल्या नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही जुन्याच जागेवर बांधण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तळोधी बा. येथील ग्रामपंचायतीला लागुन पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याची इमारत ही जीर्ण झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. परंतु नवीन इमारत ही जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर बांधण्यात येणार आहे. या गोष्टीला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे कारण या जागेवर सध्या बाजार भरविण्यात येत आहे. व ही जागा बाजाराच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी दवाखाना न बांधता जुन्याच जागेवर दवाखान्याची नविन इमारत बांधावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
जर नवीन जागेवर दवाखाना बांधण्यात आला तर आठवडी बाजाराकरिता जागेची अडचण निर्माण होऊ शकते. व जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही बेवारस स्थितीत राहील त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे नवीन पशु वैद्यकीय दवाखाना हा जुन्याच जागेवर बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सरपंच यांना निवेदन देण्यात आले आहे.
[ नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही जुन्याच जागेवर बांधण्या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र व्यवहार करण्यात येणार आहे.---- सौ.छाया मदनकर सरपंच तळोधी बा.]
[ पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही जुन्याच जागेवर बांधण्यात यावी हे सर्वांच्या सोईचे होईल.---- अतुल आमले स्थानिक दुकांनदार तळोधी बा.]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!