थोड्याश्या पावसात चिखलाचे साम्राज्य
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - सध्या चिखलातील गाव म्हणून मोहरी हे गाव पंचक्रोशीत ओळखले जात आहे. गावाच्या बाहेर निघणारे तिन्ही रस्ते चिखलाने वेढले आहेत. याचा लोकांना व शाळेकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायकल, दुचाकीने रस्त्यात पडणे आता रोजचेच झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने हे रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!